Sunday, May 17, 2026
HomeCrimeपन्हाळा : अल्पवयीन मुलाच्या दुचाकी धडकेत वृद्ध पादचारीचा मृत्यू; दोघांविरोधात गुन्हा

पन्हाळा : अल्पवयीन मुलाच्या दुचाकी धडकेत वृद्ध पादचारीचा मृत्यू; दोघांविरोधात गुन्हा

पन्हाळा प्रतिनिधी:

पन्हाळा तालुक्यातील सातार्डे येथे अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चालवलेल्या दुचाकीच्या धडकेत एका वृद्ध पादचारीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र सदाशिव नाईक (वय ३८, रा. असंडोली, ता. गगनबावडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दगडू वसंत हांडे (वय ४४, रा. सातार्डे, ता. पन्हाळा) व त्यांचा अल्पवयीन मुलगा (वय १५) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही घटना दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सातार्डे फाटा मार्गावरील कृष्णात पाटील यांच्या शेताजवळील वीज डी.पी. परिसरात घडली. आनंदा बापू नाईक (वय ७०, रा. सातार्डे) हे पायी विहिरीकडे जात असताना, मागून आलेल्या स्प्लेंडर (MH-09-EA-6198) दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नाईक यांना तातडीने कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दि. ४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गु.र. नं. ७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच अल्पवयीन मुलास दुचाकी चालवण्यास दिल्याप्रकरणी दगडू हांडे यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम ५/१८० अंतर्गत अतिरिक्त कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular