Friday, October 23, 2026
HomePoliticalपन्हाळा तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी ६७.११ टक्के मतदान; ५,२८७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

पन्हाळा तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी ६७.११ टक्के मतदान; ५,२८७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

पन्हाळा प्रतिनिधी, (शहानवाज मुजावर):
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत पन्हाळा तालुक्यात उपलब्ध झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार एकूण ७ हजार ८७८ मतदारांपैकी ५ हजार २८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे तालुक्यात एकूण ६७.११ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
पन्हाळा तालुक्यातील कळे, कोडोली-वारणानगर, कोतोली, पडळ, बाजारभोगाव, पन्हाळा, सातवे आणि आसुर्ले या मतदान केंद्रांवरील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
या आकडेवारीनुसार पडळ येथील केंद्र क्रमांक ५४७ वर सर्वाधिक ७६.९८ टक्के मतदान झाले. कोतोली येथील केंद्र क्रमांक ५४४ वर ७३.९२ टक्के, तर केंद्र क्रमांक ५४३ वर ७२.३७ टक्के मतदान झाले. पडळ येथील केंद्र क्रमांक ५४६ वर ७२.१५ टक्के मतदानाची नोंद आहे.
पन्हाळा येथील केंद्र क्रमांक ५४० वर एकूण ५९८ मतदारांपैकी ३८३ मतदारांनी मतदान केले. येथे ६४.०५ टक्के मतदान झाले. कळे येथील दोन केंद्रांवर अनुक्रमे ६७.४४ आणि ७०.७७ टक्के मतदान झाले. कोडोली-वारणानगर येथील चार केंद्रांवर ५६.६९ ते ६२.८८ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले.
तालुक्यातील सर्व केंद्रांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार मतदानाचा एकत्रित टक्का ६७.११ इतका असून, पदवीधर मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular