Sunday, October 25, 2026
HomePoliticalगोकुळ अध्यक्ष निवडीवेळी काय घडणार.... आ.सतेज पाटील यांनी केले स्पष्ट

गोकुळ अध्यक्ष निवडीवेळी काय घडणार…. आ.सतेज पाटील यांनी केले स्पष्ट

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोरमचा तांत्रिक मुद्दा पुढे आला आहे. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे, संजय मंडलिक यांनी सहकारात काम केले आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्द्यावर ते अशी कोणतीही परिस्थिती तयार करणार नाहीत. त्यांचे सगळे १२ संचालक निश्चिपणे त्या सभेला येतील, असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

आमदार पाटील म्हणाले, गोकुळ निवडणुकीत कोरमचा विषय आहे. पण बहुमताचा निकाल आमच्या बाजूने आहे. विरोधकांनी आम्हाला मिळालेल्या बहुमताचे स्वागत केले आहे. चुकीचा पायंडा राज्याच्या सहकारात पडणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ, पालक्षमंत्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे, संजय मंडलिक चुयेकरांच्या मुलाला चेअरमन करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतील अशी खात्री आहे असे सांगत आमदार पाटील यांनी गोकुळचा चेअरमन आमचाच होणार यात दुमत नाही असा दावाही केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular