Friday, October 23, 2026
HomeCrimeआपटी येथे घरफोडी; रोख रकमेसह चांदीचे दागिने लंपास  अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप...

आपटी येथे घरफोडी; रोख रकमेसह चांदीचे दागिने लंपास  अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला

पन्हाळा प्रतिनिधी शहानवाज मुजावर: 
पन्हाळा तालुक्यातील आपटी येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान आपटी (ता. पन्हाळा) येथील एका राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील रोख रक्कम आणि चांदीचे दागिने चोरून नेले.
या चोरीमध्ये १ लाख रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नोटा, आणखी ७ हजार रुपये रोख रक्कम तसेच अंदाजे १३० ग्रॅम वजनाचे चांदीचे एक पैंजण आणि अंदाजे ४० ग्रॅम वजनाची तीन ब्रेसलेट असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
याप्रकरणी कविता संदीप पाटील (वय ४२, रा. इब्राहिमपूर पेठ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(२), (३), (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१३ वाजता दाखल झाला असून, पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सनदी करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular