बहिरेश्वर प्रतिनिधी…
कोगे तालुका करवीर येथील कोगे खडक धरणाच्या पूर्वेला कोगे -वाकरेदरम्यान अर्जुन उतरेकर यांच्या शेताजवळ मगरीचा वावर दिसून आला .कोगे गावात मगर म्हणल्यानंतर गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे .घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीस वरून कोगे – वाकरे दरम्यान असणाऱ्या नदीमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी कोगेच्या तीरावरून वाकरेच्या तीराकडे तीन कुत्री पोहत जात होती .वाकरेतील एक ते दीड फूट अंतर एवढेच राहिले असता अचानक त्यातील एक कुत्रे मगरी सारख्या प्राण्याने झडप घातल्यामुळे पाण्यात गेलेले निदर्शनास आले .पण मगर स्पष्ट दिसली नसल्यामुळे फक्त शक्यता वर्तवण्यात येत होती .शनिवार आज रोजी दुपारच्या सुमारास अर्जुन उतरेकर हे शेतातील गवत कापण्यासाठी गेले असता त्यांच्या शेताजवळ मगरीने वास्तव करण्यासाठी जागा केल्याची लक्षात आली .भीतीने गारद झालेले अर्जुन उत्तरेकर यांनी धाडसाने मगर आहे का ? हे पाहण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी मगर दिसून आली .सदर बाब गावचे पोलीस पाटील दत्तात्रय मिठारी यांना फोन करून कळवले .पोलीस पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मगर असल्याची खात्री झाल्यानंतर वन खात्यातील सुदेश तांबिरे यांना फोन करून मगर असल्याचे सांगितले .यावेळी गोंधळ व गोंगाट यामुळे मगर पाण्यात गेल्यामुळे त्यावर काही करता येत नाही असे वन खात्यातील अधिकाऱ्याने सांगितले .मगर नदीच्या बाहेर आले असता तिला पकडले जाऊ शकते त्यावेळेला आपण रेस्क्यू टीमला पारित करून सदर मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले .मगर बाहेर आल्यानंतर तिला पकडले जाईल पण त्या अगोदर जर कोणी मगरीच्या भक्षस्थानी गेले तर त्याला जबाबदार कोण राहणार ? अशी कुजबुज चालू होती.त्यामुळे तात्काळ वन खात्याने या घटनेची नोंद घेऊन यावरील रीतसर कार्यवाही करणे अपेक्षित आहे