Thursday, April 30, 2026
HomeCrimeपन्हाळा वनपरिक्षेत्राकडून रानडुक्कर मांस विक्री प्रकरणी चौघांना ताब्यात

पन्हाळा वनपरिक्षेत्राकडून रानडुक्कर मांस विक्री प्रकरणी चौघांना ताब्यात

पन्हाळा : पन्हाळा वनपरिक्षेत्र व करवीर (प्रा.) वनपरिक्षेत्राच्या संयुक्त गस्ती दरम्यान मौजे नवलेवाडी (ता. पन्हाळा) येथे रानडुक्कराच्या मांसाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार तात्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला.

श्री. विनायक संभाजी वैद्य यांच्या शेडमध्ये एक रानडुक्कर जाळ्यात अडकवून कोयता व सत्तुरच्या सहाय्याने त्याचे मांसाचे वाटे करून विक्री करताना चार जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. यामध्ये श्री. सरदार संभाजी पाटील, श्री. रमेश पांडुरंग पाटील, श्री. विनायक संभाजी वैद्य व श्री. रतन हिंदुराव नवलव यांचा समावेश आहे.

वन्यप्राणी रानडुक्कर (Wild Boar / Sus scrofa) हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत अनुसूची II (भाग अ) मध्ये समाविष्ट आहे. या प्रकरणी कोयता, सत्तुर, वजन काटा तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. वनरक्षक पणुत्रे यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या कलम 2 (16), 9, 39, 50 व 51 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. उपवनसंरक्षक, कोल्हापूर श्री. धैर्यशील पाटील, मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री. विलास काळे, मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) करवीर श्री. नंदकुमार नलवडे, मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पन्हाळा श्री. अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वनरक्षक पनुत्रे श्रीमती अश्विनी मदने, वनरक्षक कळे श्री. अमर माने, वनरक्षक कोतोली श्री. बाजीराव देसाई, वनरक्षक सांगरुळ श्री. विदेश तांबारे, वनरक्षक बीड श्री. महादेव कुंभार, वनरक्षक पन्हाळा श्री. संदीप पाटील तसेच वन्यजीव बचाव पथक पन्हाळा येथील श्री. अजिंक्य बच्चे, श्री. किरण कुंभार, श्री. रोहित जाधव व श्री. अभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular