कोल्हापूर: विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाणाऱा कागल तालुका मागे कसा राहील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख नेते असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजकीय कार्यक्रम करण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांनी जबरदस्त प्लॅन केल्याची चर्चा सुरू आहे.त्यासाठी त्यानी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगेना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यासाठी हेरून नियोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागनी नंतर अजित पवारां सोबत जाउन कोल्हापूर जिल्ह्यावर राजकीय पकड मजबूत ठेवणाऱे हसन मुश्रीफ हे शरद पवार यांच्या रडारवर आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने त्यानी आता महूर्त शोधला आहे.बदलत्या राजकीय परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत कागलची जागा महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाणार हे निश्चित आहे.या परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असलेले व मुश्रीफ यांचे पारंपरिक विरोधक समरजित घाटगेंची उमेदवारीची गोची झाली आहे. या परिस्थितीचा फायदा उठवत त्या ना राष्ट्रवादी शरद पवार पक्षात घेण्यासाठी खुद्द पवारांनीच जाळे टाकलेची चर्चा आहे. त्यामुळे कागलमध्ये पुन्हा खडाखडी होणार आहे.गत निवडणूकीतील पराजयाचा वचपा काढण्याची संधी घटगेना उपलब्ध केली आहे.त्यातच संजय घाटगेनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने घाटगे गटाचे मनोबल वाढले आहे. घाटगेनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या वावडया असल्याचे म्हटले असले तरी माढया प्रमाणे शेवटच्या क्षणी हा प्रवेश होईल असे जाणकारांचे मत आहे मुश्रीफ यांनी मात्र दुरंगी तिरंगी लढत झाली तरी आपणच जिंकून मंत्री होणार असे भाकीत केले आहे. काही असले तरी शरद पवारांच्या राजकीय खेळीत मुश्रीफ घाटगे लढत निश्चित मानली जाते.