चिखली प्रतिनिधी: कोल्हापूर -पन्हाळा मार्गावरील आंबेवाडी, चिखली फाटा ते वडणगे या मार्गावर सुमारे १५ फूट उंचीचा भरावा आहे हा भरावा नागरिकांसाठी नुकसान कारक असून या ठिकाणी कमानीच्या मोऱ्या बांधाव्यात अशी मागणी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ल शिष्टमंडळाने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे विभागीय प्रकल्प अधिकारी गोविंद यांना निवेदन देण्यात आले. या शिष्ट मंडळात पाडळी बु.चे सरपंच शिवाजी गायकवाड, स्वप्नील पाटील,संभाजी पाटील आदींचा समावेश होता.