बालिंगा /प्रतिनिधी:
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना भानावर आणण्यासाठी कोल्हापूर मधील नागरिकांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे- पाटील. यांच्या शांतता रॅलीत मराठा बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन करवीर तालुका मराठा समाजाचे समन्वयक व महाराष्ट्र क्रांती सेनेचे करवीर तालुका अध्यक्ष मारुती शंकर जांभळे. ( माऊ ) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने सुरु असलेली धडपड आणि त्यांना विरोध करणार सत्तेतील सरकार यांच्याशी आरक्षण मिळविण्यासाठी पर्यायी दोन हात करण्याची गरज आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील. यांना पाठबळ देण्याची गरज आहे. यासाठी कोल्हापूर मध्ये 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे यासाठी कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील सर्व मराठा बांधवानी या शांतता रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन मारुती जांभळे यांनी केले आहे.