कोल्हापूर प्रतिनिधी – ‘कोल्हापुरातील मायबाप हो, आरक्षणाची ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. पण ते काही लोकांमुळे गेलं. तेच आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचं आहे. त्यासाठी कोल्हापुरातील मराठ्यांनों एकदिलानं पेटून उठा. मी तुमच्या सहकार्यानं लढतोय, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. ते आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवाना मार्गदर्शन करत होते. मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील आज कोल्हापुरात आले होते. त्यानंतर मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी छ. शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. सुरवातील मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि उमेश पवार यांनी जरांगे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी जरांगे पाटील यांनी अनेक मुद्द्यावर आपलं मत मांडलं.