कोल्हापूर:
कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व नाट्यगृहातून आगीचे लोट बाहेर पडत आहेत. उद्या, शुक्रवारी (दि. 9) होणाऱ्या संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134 व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे.
अग्नीशमन दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याबरोबरच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. या आगीवर नियंत्रण आणण्याचे काम संरक्षण दलाकडून करण्यात येत आहे. आगीने एवढे रुद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे सभागृहाचा फक्त सांगडाच राहिला आहे. या सभागृहासोबत जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक कलाकारांचे जवळचे नाते आहे.
या लागलेल्या भीषण आगीमध्ये कोणत्याही प्रकारे जीवित हानी झालेली नाही.