दोनवडे (प्रतिनिधी) : कोल्हापूर – गगनबावडा मार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण काम सुरू आहे. मॅन्युअली पेव्हरने काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारीवरून गुरुवारी पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली काँक्रीटीकरण काम नागरिकांनी बंद पाडले. यावेळी नागरिकांनी मोठया मशिननेच काम करावे अन्यथा हे काम थांबवावे अशी मागणी केली.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगे ते फुलेवाडी दरम्यानच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे बालिंगे येथील मोरीपासून रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. एका बाजूला रस्त्याचे काम सुरू आहे व दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे थोड्या अंतराचा पीस काँक्रिटीकरण झाल्यास त्या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात येते. काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याची प्लेन लेव्हल झाली नसल्याने रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना हादरे बसू लागले आहेत. हा त्रास कायम जाणवणार आहे त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी होत्या. गुरुवारी हे काम पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी बंद पाडले. या संदर्भात उद्या नॅशनल हायवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे.
यावेळी उत्तम निगडे, विठ्ठल राणे, सूरज वने आदींसह नागरिक उपस्थित होते.