पुणे प्रतिनिधी:
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रमुख धरणांपैकी असणारी पाच धरणे 100% भरली असून यंदा हजारो गावांची तहान भागणार आहे. पुणे विभागातील बहुतांश धरणे भरत आली असून भाटघर, वीर आणि उजनी धरण 100% ने भरले आहे. निरा देवघर 97.20%, चाकसमान 99.02%, पवना 95.27%, खडकवासला 81.43%, पानशेत 99.13%, डिंभे 83.79 टक्क्यांनी भरले आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर मधील धरणांची ही स्थिती सध्या चांगली असून बहुतांश धरणे 80 टक्क्यांच्या पुढे गेली आहेत. कोल्हापूरचा दूधगंगा प्रकल्प 85.95 टक्क्यांनी तर राधानगरी 97.82 टक्के भरला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी, साताऱ्यातील वीर, पुण्यातील भाटघर व आंद्रा, गोंदिया मधील इटियाडोह ही पाच धरणे 100 टक्क्यांनी भरली आहेत.



