Friday, January 16, 2026
Google search engine
HomeHealthहळदीमध्ये ‘हा’ पदार्थ घातल्याने कोलेस्ट्रॉल होईल कमी ...

हळदीमध्ये ‘हा’ पदार्थ घातल्याने कोलेस्ट्रॉल होईल कमी …

मुंबई प्रतिनिधी : बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे सध्या कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) समस्या वाढली आहे. निरोगी आयुष्यासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी तुम्ही तुमचे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे उच्च प्रमाण तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका निर्माण करू शकते. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची वाढती पातळी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, चांगलं आणि वाईट कोलेस्ट्रॉल. मॅक्स हेल्थकेअरच्या क्लिनिकल पोषण आणि आहारशास्त्र विभागप्रमुख रितिका समद्दार यांनी हळदीमध्ये एक पदार्थ मिसळल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकतो, असे एका अभ्यासातून दिसून आले असल्याची माहिती द इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

रितिका समद्दार सांगतात, कोविडच्या काळात आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आहारात हळदीचा समावेश केला गेला. परंतु, गेल्या काही वर्षांतील अनेक अभ्यासांमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी त्याचे फायदे आढळले आहेत. कारण, त्याच्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहकविरोधी गुणधर्म आढळतात. हळदीचा वापर प्राचीन काळापासून संसर्ग, जखम आणि पोटाच्या समस्यांसाठी केला जातो. हळद ही अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जी कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या रोगांवर उपचार करण्यास मदत करते. हळदीमध्ये कर्फ्यूमिन नावाचे संयुग असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. हळदीतील ४ ते १० टक्के भाग असलेल्या कर्क्युमिन नावाच्या बायोएक्टिव्ह कंपाऊंडच्या उपस्थितीमुळे शरीराला डीजनरेटिव्ह सिंड्रोमपासून सुरक्षा मिळण्यास मदत होऊ शकते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News