साळवण प्रतिनिधी ( एकनाथ शिंदे):
दिनांक 13/08/2024 रोजी कुंभी धरण 96.77% इतके भरलेले आहे.
जुलै महिन्यातील अतिवृष्टीच्या कालावधीत जेव्हा कोल्हापुर जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडावा लागला तेव्हा पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या गगनबावडा तालुक्यातील कुंभी धरणाच्या गेटमधून आजतागायत पाण्याचा एकही थेंब नदीपात्रात सोडावा लागलेला नाही. आणि हे शक्य झालंय कळे पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अजिंक्य पाटील, खंडेराव गाडे यांचे गतवर्षीपासूनचे सुक्ष्म नियोजन. त्याचबरोबर चौकीदार आनंदा कोपार्डेकर व बाह्ययंत्रणेवरील मच्छिंद्र खेतल ‘ जयसिंग पाटील, जयवंत वाळवेकर यांनी अहोरात्र आपली कामगिरी बजावली आहे . मागील महिन्यात आलेल्या महापुराच्या काळात अतिवृष्टीचे जास्तीत जास्त पाणी कुंभी धरणात अडवल्यामुळे कुंभी नदी काठावरील गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांना या महापुराचा कमी प्रमाणात फटका बसला आहे .
यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अजिंक्य पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे, नागरिकांचे पाटबंधारे विभागास नेहमीच सहकार्य राहिलेले आहे. तसेच शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयाने कोणत्याही आपत्तीवर थोड्या प्रमाणात का होईना मात करता येते.असे प्रतिपादन केले .