कोल्हापूर :
पावसामुळे नुकसान झालेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कुटुंबांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाना आमदार पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य आणि 10 दिवस पुरेल असा जीवनावश्यक वस्तूंचा शिधा देण्यात आला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील अनेक घरांची पडझड झाली. पावसामुळे प्रापंचिक वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे. इस्पूर्ली, उचगाव, कणेरी, कावणे, खेबवडे, गिरगाव, चुये, दऱ्याचे वडगाव, दिंडनेर्ली, नागाव, निगवे खालसा, नेर्ली, वडकशिवाले, सांगवडे, हणबरवाडी, हलसवडे या 16 गावातील 36 नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक सहाय्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचा शिधा देण्यात आला. मंगळवारी गिरगाव येथील एका कुटुंबाला आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली.