चिखली :
बी एच दादा प्रेमी युवक मंचच्या दहाव्या वर्धापन दिनानिमीत्य संह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार वितरण, विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा तसेच युवक मेळावा मोठ्या उत्साहात खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
गेली अनेक वर्षे वडणगे परिसरामध्ये विधायक उपक्रमांची मालिका अखंडितपणे राबवली जात असून युवक मंचच्या वतीने दिले जाणारे सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार महिलांच्या कार्याला प्रोत्साहित करणारे असल्याचे गौरवोद्गार काढत इतर गावातही युवक मंच सारख्या तरुणांची संघटना उभी करणे काळाची गरज असल्याचे या समारंभ वेळी बोलताना कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मत व्यक्त केले .
सौ.स्वाती शिवाजी पोवार तसेच कु.प्रेरणा शिवाजी आळवेकर यांना यंदाचा संह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार जाहीर झालेबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कोल्हापूरच्या खासदार पदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी तर्फे जेष्ठ क्रीडा संघटक पुरस्कार मिळाल्याबद्दल बी एच पाटील दादा यांचा शॉल सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
याबरोबर गावातील शासकीय सेवेत निवड तसेच क्रीडा क्षेत्रासह सहकारी संस्थांत निवडीबद्दल सेवानिवृत दहावी बारावी विद्यार्थी तसेच विशेष कार्याबद्दल तब्बल पन्नासहून अधिक गुणवंतांचा सहकुटूंब सत्कार सन्मान चिन्ह तसेच आरोग्यमित्र शेवगा देऊन खासदार छत्रपती शाहू महाराज तसेच राहूल (पी एन ) पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
वडणगे परिसरातील पूर परिस्थिती दरम्यान युवक मंचने केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करत सलग नऊ वर्षे समाजासाठी विधायक उपक्रम राबवत महिलांच्या कर्तुत्वांना उजाळा देणाऱ्या युवक मंचच्या कार्याला श्री राहुल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या . अध्यक्षीय भाषण गोकुळचे माजी चेअरमन श्री विश्वास पाटील आबाजी यांनी केले तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य श्री बी एच पाटील दादा प्राचार्य महादेव नरके सर सत्कारमूर्ती सौ.स्वाती पोवार यांनी मनोगत व्यक्त केले .
बी एच दादा युवक मंच गेली सलग दहा वर्षे सातत्यपूर्ण समाजासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा ,पुरग्रस्तांसाठी रेस्क्यू बोट सुविधा रक्तदान शिबिर , महिला , शेतकरी शिबिरे दहावी मोफत पाठ्यपुस्तके खाद्य महोत्सव दिपोत्सव , विविध प्रकारची अभियाने गुणवंतांचा सत्कार आरोग्यमित्र शेवगा असे शंभराच्या वरती सामाजिक अखंडीत उपक्रम तसेच महिला सक्षमिकरणासाठी आत्तापर्यंत सलग दहा वर्षे वडणगेतील एकूण वीस महिलांना सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार देऊन आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोकुळचे माझी चेअरमन श्री विश्वास पाटील आबाजी यांनी स्विकारले होते. कार्यक्रमाला बी एच पाटील दादा श्री बाळासाहेब खाडे श्री बाबासाहेब चौगले श्री भरत पाटील श्री हंबीरराव वळके श्री के एस पाटील एम जी पाटील बापू प्रा महादेव नरके सोसायटी चेअरमण श्री अजित जाधव माजी सरपंच श्री सचिन चौगले श्री केवलसिंग रजपूत चिखली ते सरपंच रोहित पाटील सरपंच शिवाजी गायकवाड व्हा चेअरमन सौ मंगल शेलार नेताजी चौगले माणिक जाधव दिनकर पाटील आण्णासो देवणे दिलीप ठाणेकर शिवाजी पाटील महादेव पाटील अध्यक्ष युवराज साळोखे उपाध्यक्ष सतीश चेचर तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
स्वागत व प्रास्ताविक युवा नेते श्री.रविंद्र पाटील यांनी केले सूत्रसंचालन आर.बी. देवणे सर तर आभार पोपट चौगले यांनी मानले.