Sunday, December 7, 2025
Google search engine
HomePOLITICALछत्रपती संभाजीराजे लागले विधानसभा निवडणुकींच्या तयारीला..

छत्रपती संभाजीराजे लागले विधानसभा निवडणुकींच्या तयारीला..

कोल्हापूर :

स्वराज्य पक्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील नवउद्योजकांसाठी महामंडळाचा महा EXPO कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महा EXPO च्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या १३ महामंडळांचे प्रतिनिधी, बॅंक कर्मचारी, सेतू कर्मचारी, चार्टर्ड अकाऊंटंट, विविध उद्योग प्रतिनिधी, वाहन विक्रेते यांना एकाच ठिकाणी एकत्र आणण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्या.

यावेळी स्वराज्य सरचिटणीस धनंजय जाधव, सोलापूर जिल्हाप्रमुख प्रा. महादेव तळेकर, अभिजीत पाटील, शिवतेज मोहिते पाटील, महेश गवळी, अॅड. विलास पवार, आशुतोष तोंडसे, विजय जरे व स्वराज्य चे राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News