बालिंगा/प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजकांच्या दारात जाऊन बँकेच्या वतीने ‘क्यूआर कोड स्टॅन्डसह साउंड बॉक्स’ सुविधा देत आहे याचा लाभ छोट्या मोठ्या व्यापारी यांनी घ्यावा असे उदगार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी बालिंगा व कोगे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या माध्यमातून व्यापारी बँकेशी व्यवहार करणार आहेत. दोन महिन्यांत एक लाख ग्राहकांपर्यंत क्यूआर कोड पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून आज करवीर तालुक्यातील व्यापाऱ्यांना उद्योजकांना या क्यूआर कोडचे वाटप नूतन संचालक श्री. राजेश दादा पाटील यांच्या हस्ते तसेच राहुल पाटील माजी अध्यक्ष जिल्हा परिषद यांचे प्रमुख उपस्थितीत आज पार पडला.
यावेळी शाहू काटकर (संचालक), अनिल पवार (अध्यक्ष तंटामुक्त समिती व माजी सरपंच), पांडुरंग वाडकर (सरपंच), जे डी पाटील, सुरेशराव सूर्यवंशी, वंदना इंगवले (सरपंच), कृष्णात फडतरे, कृष्णा पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश पाटील, मारुती पाटील, करण पाटील, तानाजी मोरे, एम एस भवड, तानाजी निगडे, नंदकुमार जांभळे, धनंजय टेंगे, अजय भवड, मयूर जांभळे, विजय जांभळे, पंकज कांबळे, प्रकाश जांभळे, विजय पवार, रघुनाथ कांबळे कोतवाल,संभाजी पाटील, जी एम शिंदे, एस डी आडनाईक, सुनील वरुटे, पी वाय कुंभार, आर व्ही चव्हाण, एस बी पाटील आदी उपस्थित होते