Friday, January 16, 2026
Google search engine
Homecrimeखुपीरेत दुध टँकरच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार.. !

खुपीरेत दुध टँकरच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार.. !

दोनवडे प्रतिनिधी :
खुपीरे येथील बल्क सेंटर मधील दूध आणण्यासाठी आलेल्या टँकरने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकल वरील युवक जागीच ठार झाला .

कृष्णात खेमराज बेगडा वय ३० मूळ गाव रत्नागिरी सध्या रा.  बालिंगे ता करवीर असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, मृत युवक महादेव प्रसाद हॉटेल , दोनवडे येथे कुक म्हणून काम करतो. खुपीरे ग्रामीण रुग्णालयातील कार्यरत मावस भावाकडे तो आला होता . सकाळी ८ च्या सुमारास तो दोनवडे येथील हॉटेल कडे निघाला असता कोल्हापूरकडून येणाऱ्या गोकुळसाठी दूध आणणाऱ्या टँकरने एम एच ०९ जीजे ४१४९ ने त्याला सामोरा समोर धडक दिली . त्यात तो जागीच ठार झाला . टँकर चालक पळून गेला असून अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत . अपघाताचे दृश्य इतके विदारक होते कि लोक हळहळ व्यक्त करीत होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News