मुंबई प्रतिनिधी :
देशातील अत्यंत महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे.
अशातच आता या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने(IMA) सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा 17 ऑगस्टला सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहेत. या घटनेमुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.
17 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
आयएमएने एक पत्रक काढून 17 ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा 17 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान अत्यावश्यत सेवा सुरू राहणार आहे. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत.
24 तासांत खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू
शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 या 24 तासांत फक्त खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू राहणार असल्याची माहिती आयएमएने दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.