कोल्हापूर :
109 इन्फंट्री बटालियन टीए मराठा लाईट, कोल्हापूर टेरियर येथे क्रांतीज्योती बहुउद्देशीय कोल्हापूर संस्थेच्या वतीने एक राखी भारतीय जवानांसाठी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. देश रक्षाबंधन या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने भगिनींनी राखी बांधून भावाला औक्षण केले जवान बांधवांनी ही आपल्या बहिणीचा मान राखून आपले कर्तव्य पार पाडले.

या रक्षाबंधन कार्यक्रमास उपस्थित भारतीय सेनेतील जवान संजय वाघे उमेश वळगड्डी संदीप पाटील बसवराज पाटील संदीप चौगुले आकाराम पाटील प्रदीप खांबे संतोष हातकर संदेश वाघ निवास जाधव सुहास पवार संदीप कोरे दत्ता दळवी श्रीधर शिंदे महेश पाटील आप्पासो घोरपडे श्रीधर जोशीलकर युवराज सूर्यवंशी प्रवीण कोरे रामा संकपाळ अजित पाटील जयराम घाटे या जवान बांधवांनी राख्या बांधून आम्हालाही आमच्या सख्ख्या बहिणींसारखे प्रेम देऊन हा राखी बंधनाचा धागा आम्हाला देऊन अजून आमची जबाबदारी वाढविण्याचे बोलून दाखवले. संस्थेच्या भगिनी पूजा ताई सोनवणे ,माजी सैनिक पत्नी संगीताताई रेडेकर, धनश्रीताई पाटील, अनिताताई, स्वातीताई सोनवणे,पूर्वा ,शर्वरी सोनवणे , वेदिका चव्हाण, ग्रामदेवता हातकणंगले तालुका प्रतिनिधी सौ मधु धनवडे सावित्री धनवडे आणि प्रीत संगम दैनिकाच्या प्रतिनिधीअपर्णा पाटील ज्येष्ठ पत्रकार अरुण कृष्णराव शिंदे अध्यक्षा रूपाली चव्हाण माजी सैनिक शिवाजी चव्हाण छायाचित्रकार सार्थक चव्हाण उपस्थित होते. तसेच संस्थेने एक राखी सीमेवरील जवानांसाठी या उपक्रमा अंतर्गत दि. 14 ऑगस्ट रोजी सीमेवरील जवान बांधवांना राख्या पाठवल्या आहेत.




