पुणे प्रतिनिधी : राज्यात विधानसभेसाठी जोरदार सुरुवात झाली आहे. महायुती अन् महाविकास आघाडीबरोबरच मनसे, वंचित बहुजन आघाडी, व इतर घटक पक्षही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा सरकारला अल्टिमेटम देत विधानसभा लढविण्याचे संकेत दिले आहेत. अशातच दिवंगत शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेही स्वतः विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.




