सांगली प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचा वाद झाला होता. ठाकरेंनी हट्टाने सांगलीची जागा काँग्रेसकडून आपल्याकडे घेतली आणि त्याठिकाणी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंततदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले. यात विशाल पाटलांनी दणदणीत विजय मिळवला. आता याच विजयात हातभार लावणाऱ्यांना विशाल पाटील मदत करणार आहेत. त्यात खानापूर मतदारसंघात सुहार बाबर यांच्या पाठिशी असल्याचं खासदार विशाल पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे .




