Sunday, December 7, 2025
Google search engine
HomeSocialबालिंगेचे जागृत देवस्थान श्री महादेव ; भाविकांचे श्रद्धास्थान

बालिंगेचे जागृत देवस्थान श्री महादेव ; भाविकांचे श्रद्धास्थान

बालिंगा ( मोहन कांबळे):
कोल्हापूरच्या पश्चिमेला कोकणात उतरणाऱ्या ( कोल्हापूर – गगनबावडा ) मार्गावर बालिंगे (ता. करवीर) येथील महादेव मंदिर एक अत्यंत जागृत देवस्थान म्हणून उदयास आले आहे. हे मंदिर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महादेव लिंगाच्या आकारात उभारले आहे. महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते, मंडळाच्या प्रयत्नातून साकारलेले हे मंदिर आजच्या तरुणांपुढे एक आदर्श आहे.

बालिंगे-दोनवडे गावच्या सीमेवर असलेल्या रिव्हज पूल तयार करण्याचे काम सुरू असताना पायखुदाईवेळी कारागिरांना एका भल्या मोठ्या शिळेवर महादेवाचे लिंग आढळून आले, तसेच बालिंगे गावाच्या नावातच लिंग हा शब्द असल्याने यामध्ये केवळ योगायोग नाही तर काही साधर्म्य असावे, अशी धारणा झाली आणि लिंगाची प्रतिष्ठापना नदी तिरावर केली हा पूल पूर्ण होईपर्यंत कामगार त्याची दररोज पूजा करत असत पूल पूर्ण झाला मात्र येथील लोकांची भक्ती कायम राहिली. प्रतिष्ठापना केलेले लिंग ओढ्यावर असू नये म्हणून त्यावेळच्या लोकांनी एक मंदिरवजा वास्तू या लिंगावर बांधली.
मंदिर उभारणी केल्यावर येथील तरुणांनी एकत्र येऊन १० मे १९८३ साली महादेव तरुण मंडळाची स्थापना केली, २००७ साली या मंडळाने रौप्यमहोत्सव साजरा केला. महादेवावर असलेली भक्ती आणि त्यांच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागल्या, अशी धारणा तरुणांची झाली आणि मंदिर सुशोभित करण्याचा सर्वांनी निर्धार केला. दरवर्षी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी येथे अभिषेक घालण्यात येतो. गेली 41 वर्षे ही प्रथा मंडळाच्या पुढच्या पिढीने आजही जपली आहे. देवाची पूजाअर्चा नित्यनेमाने बाळासाहेब अतिग्रे हे करतात. बालिंगे, दोनवडे, नागदेववाडी, साबळेवाडी, खुपिरे, वाकरे आदी परिसरात या मंदिराची ख्याती आहे. येथील अनेक भक्त येथे दर्शनासाठी येतात. मंदिराच्या शेजारी सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे. येथे 20 ते 22 हजार भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.परिसरातील हजारो नागरिक महाप्रसादाचा लाभ घेतात.
या देवस्थानला क वर्ग दर्जा होता, देवस्थानच्या विकासासाठी ब वर्ग दर्जा मिळावा अशी महादेव तरूण मंडळाची मागणी होती. नुकतेच ( १० नोव्हेंबर २२ ) शासनाने दोन वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्हातील ग्रामीण भागातील ११ ग्रामीण तीर्थक्षेत्रांना *ब* वर्गीचा दर्जा दिला. त्यामध्ये बालिंगेच्या महादेव मंदिराचाही समावेश आहे. ग्राम प्रशासन, महादेव मंडळ, अनेक राजकीय, सामाजिक कार्याकत्यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले आहे. गंगावेश येथून कोगे, बहिरेश्वर, कुंभी कारखांना, बसेस आहेत. तर रंकाळा एसटी स्टॅडवरून कोकणात जाणाऱ्या एसटी येथे पोहचता येते.

 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News