कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अवधी असला तरी करवीर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रदीप नरके – कोरेंच्यातराजकारणसुरू झाले आहे.
विधानसभा निवडणुकीला अद्याप काही अवधी असला तरी करवीर विधानसभा मतदारसंघात मात्र त्या आगोदरच माजी आमदार चंद्रदिप नरके विरूद्ध आमदार विनय कोरे यांच्यात दबावाचे राजकारण सुरू झाले आहे.महायुतीत त्यामुळे बिघाडीची चिन्हे दिसत आहेत. आ.कोरे यांनी कांहीं दिवसापूर्वी आसगाव येथे झालेल्या कार्यकत्याच्या मेळाव्यात करवीर विधानसभा मदारसंघातून संताजी बाबा घोरपडे यांच्या नावाची जनसुराज्य पक्षातून उमेदवारीची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. तर ही घोषणा म्हणजे माजी आमदार चंद्रदिप नरके याना एक प्रकारचे आव्हानच होते. एवढेच काय गगनबावडा,पन्हाळा पश्चिम व शाहूवाडी या करवीरच्या मतदार संघात आज ही आपलाच प्रभाव आहे .त्यामुळे संताजी घोरपडे यांचा विजय निश्चित असल्याचे त्यानी घोषित केले. महायुतीत एकत्र असतानाही कोरेनी घेतलेला निर्णय नरकेंच्या कार्यकत्याना आवडलेला दिसत नाही तर चंद्रदिप नरकेंच्या जिव्हारी लागला आहे. एकीकडे काँग्रेसचे उमेदवार व स्वर्गीय आम.पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहूल याना शह देण्याची तयारी सुरू असतानाच महायुतीतुन सुरू झालेला हा राजकीय हल्ला मनाला लागला असे दिसते. आता तर नरके यांनी शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात आपला प्रभाव असल्याचे सांगत तेथे शिंदेसेना पक्षाकडून उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू असल्याची घोषणा करून विनय कोरे यांच्या वर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महायुतीतील बिघाडी बाबत त्यांचे वरिष्ठ नेते आता काय निर्णय घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. तर कोरे आणि नरके यांच्यातील राजकीय वाद आता कोणत्या थराला जातोय याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.