Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomeSocialगोकूळ चे अनोखे रक्षाबंधन..

गोकूळ चे अनोखे रक्षाबंधन..

कोल्हापूर : रक्षाबंधन बहिण भावाच्या नात्याची माहिती सांगणारा. या दिवशी बहिण भावाला राखी बांधत सुखी समृद्ध अशी प्रार्थना करते तर भावा बहिणीच्या कल्याणासाठी आज पाठीशी आहे याची ग्वाही देत असतो. सख्या नात्याची ही वीण अधिक घट्ट होत असताना दुसरीकडे रक्ताच्या नात्या पलीकडील बहिण भावाचे नातेबंध कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील भारती चिंचणे तसेच बेलवले (ता.कराड) येथील वैशाली शिंदे यांच्याकडून २००५ सालापासून आजतागायत म्हणजेच गेली १९ वर्षे हा कार्यक्रम गोकुळचे चेअरमन व संचालक मंडळ यांना राखी बांधून आपले ऋणानुबंध जपलेले आहेत.

प्रति वर्षाप्रमाणे यंदाही गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अधिकाऱ्यांना भारती चिंचणे व वैशाली शिंदे यांनी राखी बांधत बहिण भावाचे नाते आणखी दृढ केले. हा कार्यक्रम गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे पार पडला.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना वैशाली शिंदे व भारती चिंचणे म्हणाल्या कि, गोकुळचा अशिर्वाद आमच्या सारख्‍या अनेक निराधार महिलाना लाभले आहेत. गोकुळचा ऋणानुबंध जिवनात नवीन आशा-आकांक्षा निर्माण करणारा असून गोकुळचे हे ऋण याजन्मी न फिटणारे आहे. गोकुळ परिवारास आमच्या सारख्या अनेक निराधार महिलांचे आशीर्वाद लाभोत व विश्वात गोकुळचे नाव उज्वल होवो अश्या भावना वैशाली शिंदे व भारती चिंचणे यांनी रक्षाबंधन निमित्त राखी बांधताना व्यक्त केल्या.

यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, शेतकरी वाहतूक संस्थेचे चेअरमन अरविंद देसाई, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, अनिल पाटील उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News