Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSocialभगिनिंच्या सर्वांगिण सुरक्षेसाठी कायमच कटिबद्ध : समरजितसिंह घाटगे

भगिनिंच्या सर्वांगिण सुरक्षेसाठी कायमच कटिबद्ध : समरजितसिंह घाटगे

कागल,प्रतिनिधी :”रक्षाबंधन ” बहिण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतिक असलेला हिंदू सण.या सणाच्या निमित्ताने हिंदू परंपरेप्रमाणे कागलमधील महिला भगिनींच्या थेट घरी जाऊन,राजे समरर्जीतसिंह घाटगे यांनी वेगळ्या पद्धतीप्रमाणे हा सण साजरा केला. राजेसाहेब यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमास महिला भगिनींच्या कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विशेष म्हणजे, गोसावी समाजातील भंगार गोळा करणाऱ्या अनेक महिलां तसेच मुजावर गल्ली नजीकच्या रुकसाना जमादार व शाकीरा जमादार या मुस्लिम कुटुंबातील महिला राजें दारात येताच उत्स्फूर्तपणे राजेंना राखी बांधण्यासाठी पुढे आल्या.

या उपक्रमाबाबत बोलताना घाटगे म्हणाले, शासकीय योजनेचा लाभ मिळालेल्या अनेक लाभार्थी महिलांनी मला माझ्या घरी येऊन राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यापेक्षा मला वाटले, आपणच त्यांच्या घरी गेलो तर सर्व भगिनींच्या दृष्टीने ते सोयीचे होईल. म्हणूनच आम्ही त्यांच्या घरी जाऊन हा सण त्यांच्यासोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. कागल शहरात महिला कडून मिळालेला प्रतिसाद व प्रेम पाहून खूप भारावून गेलो असून, समाजसेवेबरोबर सर्व भगिनिंच्या सर्वांगिण सुरक्षेसाठी मी कटिबद्ध राहणार आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News