कोल्हापूर , विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोल्हापूर जिल्हा भाजपाचे.ग्रामीण अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजिनामा दिला. भाजपचे अध्यक्ष समरजित घाटगेंच्या पाठोपाठ देसाई यांनी राजिनामा दिल्याने राजकीय गोठात मोठी खळबळ उडाली आहे.तसेच भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जातो. देसाई हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते. लवकर ते राजे समरजित घाटगे याची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आहेत.आजरा भुदरगड व राधानगरी तालुक्यात त्याना माननारा मोठा गट आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश अबीटकर यांचे ते राजकीय विरोधक आहेत. या निवडणुकीत त्यानी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. देसाई यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठे खिंडार पडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते प्रवेश करतील.व समरजित घाटगेंच्या सोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे