कोल्हापूर : समरजित घाटगे यांना भाजपात थांबवण्यासाठी भाजपकडूनच हालचाली सुरु झाल्या आहेत . भाजप नेते खास धनंजय महाडिक यांनी स्वतः उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली असून त्या चर्चेनुसार समरजितसिह घाटगेना विधानपरिषदेची ऑफर देण्यात येत आहे .
आजच घाटगे व महाडिक यांच्यात भेट होऊन या चर्चेत या ऑफर बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत त्या पक्षप्रवेशासाठी कागल च्या गैबी चौकात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजनही सुरु झाले आहे . पालकमंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थांनासमोरच कार्यक्रम स्थळ निश्चित केल्याने एकच खळबळ उडाली आहे . दरम्यान भाजपचे नेते व राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी समरजित घाटगेंना भाजपमध्येच थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत . आज सायंकाळी ते समरजित घाटगेंना भेटूनविधान परिषदेचीमोठी ऑफर देणार असल्याचे समजते .