कोल्हापूर : शिये येथे दहा वर्षाच्या बालीकेवर अत्याचार करून खुन झालेची घटना आज उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने सीपीआर व सीपीआर चौक येथे जोरदार निदर्शने केली. चले जाव चले जाव गृहमंत्री चले जाओ, या राज्य सरकारचे करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला .
या वेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी राज्य सरकार विरोधात संतप्त शब्दात घोषणा दिल्या. कोल्हापूरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत.राज्य शासन बरखास्त करावे अशी मागणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहर अध्यक्ष रवी इंगवले ,सागर साळोखे ,अभिजीत बुकशेठ आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.