कागल प्रतिनिधी: कागलच्या विकास साठी निवडणूक लढवणे गरजेचे आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय समरजीत सिंह घाडगे यांनी कार्यकर्त्यांच्या कागल येथील मेळाव्यात बोलताना जाहीर केला.
दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे घाटगे यांची भेट घेणार आहेत .कागल ला स्वराज्य मिळवण्यासाठी आपण निर्णय घेत असल्याचे समरजीत घाटगे यांनी जाहीर केले या मेळाव्यास कार्यकर्त्यांनी तुडुंब गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी तुतारी घेऊन ही निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. आता ही वेळ आली आहे निर्णय घेण्याची त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बळावरच गुलाल उधळणारच असेही ते म्हणाले
माझ्या निर्णयाबाबत माझे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,बावनकुळे, चंद्रकांत दादा पाटील यांनाही उघडपणे बोललो आहे .”कागलच्या स्वराज्यासाठी ही निवडणूक राष्ट्रवादी पक्षातर्फे लढवणार” असे सांगणारा मी एकमेव नेता आहे असे घाटगे यांनी सांगितले