कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली जिल्ह्यातील राजकीय खेळी यशस्वी होत आहे.
त्यांचे प्रथम टार्गेट असलेले आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शाहू समूहाचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांना आपल्या पक्षात घेऊन सज्ज केले आहे. येत्या 3 तारखेला कागलमध्ये मुश्रीपांच्या घरासमोर गैबी चौकात सभा घेऊन त्यांचा पक्षप्रवेश केला जाणार आहे.
दोन दिवसापूर्वी भाजपचे नेते आणि खासदार धनंजय महाडिक यांनी समर्जीत घाडगे यांना विधान परिषदेवर संधी देऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता पण आता आपण बरेच पुढे गेलो आहोत असे सांगत समर्जीत घाडगे यांनी निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान दिले आहे या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे .याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना विचारणा केली असता ते म्हणाले घाटगे हे निवडणूक लढवणारच असल्याने त्यांना कोण थांबवणार? असे स्पष्ट केले.
घाडगे यांच्या या निर्णयाने जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल मध्ये पवारांनी भगदाड पाडून केलेली राजकीय खेळी यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.