कोल्हापूर:
गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. राज्यात लहान मुले महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यास महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लाखो रुपयांची जाहिरातीतून उधळण चालू आहे तर दुसरीकडे याच बहिणींच्यावर अत्याचाराच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांना शाळेत पाठवायचे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे अशा या राज्यातील युती शासनाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा यासाठी वंचित बहुजन माथाडी संघटनेच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात निदर्शने केलीत. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संजय गुदगे उपाध्यक्ष समाधान बनसोडे लक्ष्मण सावरे संभाजी कागलकर प्रशांत वाघमारे भारत कोकाटे सुहासिनी माने नजमा मोकाशी कल्पना शेंडगे आदींनी केले.




