Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomeEducation"संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या"  वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

“संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या”  वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

कोल्हापूर :  शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचविलेल्या सौ. सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे ‘संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या’  “१२ व्या  वर्धापन दिनानिमित्त” विविध   नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन दिनांक २३ आणि २४ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले  आहे.  प्रसार माध्यमास असी माहिती इन्स्टिट्यूटचे प्राचार्य,  डॉ. विराट व्ही.  गिरी यांनी दिली.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे  ‘एनबीए’ मूल्यांकन प्राप्त सर्व विभाग, उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या संकुलनामध्ये उपलब्ध असलेले अभ्यासक्रम :  एक वर्ष कालावधीचे शॉर्ट-टर्म (अल्पमुदतीचे अभ्यासक्रम), दोन वर्षे कालावधीचे औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय), तीन वर्षे कालावधीचे तंत्रनिकेतन (डिप्लोमा अभ्यसक्रम), आणि चार वर्ष कालावधीचे बी-टेक पदवी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी कॅम्पसमध्ये सकाळी १०.०० ते ०५.००  या वेळात सर्वांसाठी  ‘रक्त दान शिबीर’ व ‘पुस्तक संकलन शिबीराचे’ आयोजन करण्यात आले आहे.  दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी  ”जीवन सुंदर आहे..” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणुन श्री. गणेश शिंदे यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून  शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विविध विषया मध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थांना व  शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांना  मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.  विद्यार्थांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून दुपारी  ३.०० ते ०५ .०० संगीत बँड  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
वर्धापन कार्यक्रमाच्या आयोजन कमिटीचे प्रमुख प्रा. सौ. बी. एस. भालेकर, प्रा. एम. एस. काळे आणि नियोजित केलेल्या वेगवेगळ्या  कमिटीचे  प्रमुख कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.  

 यावेळी विश्वस्त, विनायक  भोसले यांनी वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News