Wednesday, June 25, 2025
Google search engine
HomeSocialबाबा घोरपडे यांच्याकडून लाडक्या बहिणींचा हृदय सन्मान

बाबा घोरपडे यांच्याकडून लाडक्या बहिणींचा हृदय सन्मान

दोनवडे :
व्हिजन चॅरिटेबल चे अध्यक्ष बाबा घोरपडे (संताजी)यांच्या संकल्पनेतून ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी योगदान दिलेल आहे त्यांचा सत्कार सोहळा आज कोपर्डे येथे आयोजित करण्यात आला .


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जन सुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष  आमदार विनय रावजी कोरे  होते .मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घराघरातील महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करवीर मतदारसंघातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अहोरात्र कष्ट घेतले त्यामुळेच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता आली .
तसेच बचत गटातील महिलांच्या सीआरपी यांच्यामुळे करवीर मतदारसंघांमध्ये बचत गटाचे सर्वच उपक्रम यशस्वीपणे पार पडतात तसेच महिला बचत गटांना याचा भरपूर फायदा घेता येतो.
आशा सेविकांचे आरोग्य क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान आहे .
या सर्वच महिलांच्या विविध क्षेत्रातील योगदानामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमी वर या सर्व महिलांचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता .
या सोहळ्याला करवीर पंचक्रोशीतील हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला . हा सन्मान सोहळा साकारतानाच बाबा घोरपडे यांनी संपूर्ण देशभरामध्ये महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसेच महिलांच्या विनयभंग होणाऱ्या किंवा काही विकृत घटना घडणार असतील तर तुमच्या पाठीशी तात्काळ उभे राहणे आणि तुमचे संरक्षण करणे हे मी माझा आद्य कर्तव्य समजतो असं प्रतिपादन या वेळेला बाबा घोरपडे यांनी केले.
 मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेही मुख्यमंत्री बहिण योजना सुरू केल्याबद्दल बाबा घोरपडे यांनी आभार मानले .
लाडकी बहिण योजना ही समर्थपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी व त्यात कोणताही भ्रष्टाचार होऊ नये याच हेतूने महिलांच्याच हातात या योजनेचे फॉर्म भरण्याचे काम हे दिलं होतं कारण महिला पारदर्शी पद्धतीने काम करतात असे सन्मानजनक उद्गार विनय कोरे  यांनी यावेळी व्यक्त केले .
यावेळी करवीर पंचायत समितीचे उमेद चे अधिकारी आरती पाटील ,किरण रायकर व निलोफर शेख यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास करवीर पंचायत समितीचे सभापती रणजीत शिंदे, प्रधान पाटील ,शिवाजी तोडकर,हिंदुराव पाटील ,भरत घाडगे ,सौ शुभांगी मिठारी सरपंच पिरवाडी अर्चना विचारे , मनीषा जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News