महिलां व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन माणुसकीला काळीमा फासणा-या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. शिये ता करवीर येथील १० वर्षीय परप्रांतीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपी मामाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी ताराराणी ब्रिगेड महिला मंचच्या वतीने शिरोली पोलिस ठाण्यास निवेदन देण्यात आले .
बुधवारी दुपारपासून परप्रांतीय मुलगी बेपत्ता झाली असल्याची माहिती शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी याना रात्री उशीरा कळताच त्यानी कोणताच विलंब न करता स्थानिकांच्या मदतीने रात्रभर ओढे , नाले उसाच्या शेता व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहीले पण कोणताच पुरावा हाती लागला नाही पण गुरुवारी सकाळी परत शोध मोहीम राबवून श्वानाच्या मदतीने घटनास्थलापर्यंत पोचता आले . पोलिसांनी संशयित आरोपी याना ताब्यात घेवून त्यांच्याकडे अदिक चौकशी केले असता नात्याने मामा असणाऱ्या दिनेशकुमार साह याने गुन्ह्याची कबुली दिली . त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे शिये येथील घटना अतिशय निंदनिय आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात या गुन्हयाचा छडा लाविला या बददल आम्ही पोलिस कर्मचा-यांचे विशेष आभार मानतो व ताराराणी ब्रिगेड महिला मंच तर्फे निषेध नोंदवून आरोपींवर कठोर करावाई करणेत यावी अशी मागणी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली तर शालेय मुलींसाठी आपल्या निर्भया टिम तर्फे शाळा स्तरावर समुपदेशन करणेत यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी ताराराणी ब्रिगेड संचालिका अनिता माने , राजश्री पाटील , सुचिता कोरवी, आर्चना पाटील आदिसह उपस्थित होते .