Wednesday, June 18, 2025
Google search engine
Homecrimeशिये फाटा येथे अपघातात मोटरसायकलची पादचाऱ्यास धडक ; पादचारी व मोटरसायकल स्वार...

शिये फाटा येथे अपघातात मोटरसायकलची पादचाऱ्यास धडक ; पादचारी व मोटरसायकल स्वार दोघे ठार..

शिरोली पु.: पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हाॅटेल दुर्गामाता समोर दुचाकीची पादचाऱ्यास धडक होऊन पादचारी व दुचाकी स्वार जागीच ठारझाले. हा अपघात रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला .


घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हाॅटेल दुर्गामाता शेजारी कोल्हापूरहून पुणेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटरसायकल ( क्रमांक एम एच ०२ ई एम ०१२३ ) ने रस्ता ओलांडून दुर्गामाता हाॅटेलकडे येणाऱ्या किणी ता. हातकणंगले येथील सचिन उर्फ पोपट कुमार चौगुले ( वय ४४ ) याला जोराची धडक बसली त्यात तो जागीच ठार झाला तर मोटरसायकलस्वार सौरभ संजय साळुंखे ( वय २८ रा.नागाळा पार्क, कोल्हापूर ) हा गाडीसोबत ३० ते ३५ फूट फरफटत गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तो मयत झाला .
सचिन चौगुले हा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एसीआर कंपनीत कामास असल्याने तो शिये फाटा येथे बसमधून उतरून सेकंड शिप्ट ( दुसऱ्या पाळीत ) कामावर येत होता. त्यावेळी रस्ता ओलांडताना भरधाव मोटरसायकलची धडक बसून तो जागीच ठार झाला. सचिन हा एकुलता एक व अविवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील व विवाहीत तीन बहिणी असा परिवार आहे तर सौरभ साळुंखे हा सिव्हिल इंजिनीअर असून त्यांचा कन्स्ट्रक्शन चा व्यवसायासह शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये वडीलांच्या कंपनीत तो त्यांना मदत करत होता. घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News