कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तिसरा धक्का बसत आहे. राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के.पी.पाटील हे लवकरच शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत.
मातोश्रीवरून त्याना बोलवण्यात आले आहे. के.पी पाटील हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आहेत.त्यामुळे के.पी.पाटील यांचा शिवसेना प्रवेश हा महायुती बरोबरच मुश्रीफ यांच्यासाठी ही धक्का मानला जातो.महायुती कडून विदयमान आमदार प्रकाश अबीटकर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याने के.पी.पाटील यांची कोंडी झाली होती.त्यामुळे त्यानी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.या बदलत्या राजकीय घडामोडीने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.