कोल्हापूर: कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ च्या आज झालेल्या पशुखाद्य कारखाना येथील सभेवेळी सत्तारूढ व विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्या समर्थकात जोरदार राडा झाला यावेळी कार्यकर्ते व पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली.
संचालिका शौमिका महाडिक सभास्थळी येतात त्यांच्या समर्थकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये धुमस चक्री झाली महाडिक यांच्या समर्थकांनी आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या तर आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी सतेज पाटलांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या त्यामुळे जोरदार सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला. त्यानंतर शौमिका महाडिक यांना प्रवेश देण्यात आला. पण कार्यकर्त्यांना अडवल्यानंतर जोरदार वादावादी झाली बॅरिगेट्स तोडून महाडिक समर्थकांनी सभास्थळी प्रवेश केला. पोलिसांनाही त्यांना आवरणे अवघड झाले होते. दुसरीकडे सभास्थळी गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे हे स्वागत पर भाषण करीत होते यावेळी काही कार्यकर्त्यांनी बोगस दूध संस्था नोंदणी केली आहे तसेच दुधाचे संकलन कमी झाल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली.