दिंडनेर्ली (सागर शिंदे ): दिंडनेर्ली (ता.करवीर) येथील श्री दत्त सहकरी दूध व्यावसायिक संस्थेच्या बंद कार्यालयाचे कुलूप तोडून ६० हजार रुपयांची रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद संस्थेचे सचिव उत्तम काशिनाथ पाटील यांनी दिली.चोरीची ही घटना गुरुवारी(२९) रात्री घडली आहे.इस्पूर्ली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्रवारी दूध उत्पादकांच्या बिलाची रक्कम देनेची असलेने सचिव उत्तम पाटील यांनी ही रक्कम गुरुवारी कार्यालयातील तिजोरी मध्ये आणून ठेवली होती. शुक्रवारी सकाळी दूध संकलन करण्यासाठी संस्थेत आलेनंतर चोरीची घटना उघडकीस आली. दूध संकलन विभाग व कार्यालयाचे कुलूप तोडून, तिजोरी उचकटून रोख रक्कम लंपास केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.जे. मगदूम यांनी सहकारी सहायक फौजदार अजित देसाई, हेड कॉन्स्टेबल सुरेश माने, यादव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. पोलीस हेड कॉन्स्टेबल यादव अधिक तपास करीत आहेत.