Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALशिवरायांच्या अवमानाचे प्रायश्चित सताधाऱ्यांना भाेगावे लागेल :आमदार सतेज पाटील

शिवरायांच्या अवमानाचे प्रायश्चित सताधाऱ्यांना भाेगावे लागेल :आमदार सतेज पाटील

कोल्हापूर :छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे हा राज्य सरकारचा नाकर्तेपणा असून त्यांची अकार्यक्षमता यातून सिद्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अवमानाचे प्रायश्चित सत्ताधाऱ्यांना भाेगावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.


आमदार पाटील म्हणाले, आपटेंना नौदलापर्यंत कुणी पोहचवले, त्यांची शिफारस कोणी केली याची माहिती मिळवणे आवश्यक आहे. बदलापूरच्या आपटे पासून कल्याणच्या आपटे पर्यंतचा प्रवास त्यांना वाचवण्यासाठी चालला असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. जयदीप आपटेला अटक झाल्याशिवाय यातील सत्य बाहेर येणार नाही असे सांगत आमदार पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. शिवरायांचा अवमान करण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी केले असून त्याचे प्रायश्चित त्यांना भोगावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News