Monday, June 23, 2025
Google search engine
HomeSocialसकल धनगर समाजाचे 9 सप्टेंबर पासून आंदोलन..

सकल धनगर समाजाचे 9 सप्टेंबर पासून आंदोलन..

सोलापूर  :  धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सकल धनगर समाजाने येत्या ९ सप्टेंबरपासून पंढरपुरात उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने समाजाच्या शिष्टमंडळाने सोलापुरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून निवेदन सादर केले आहे.

सकल धनगर समाजाचे राज्य समन्वयक प्रा. शिवाजी बंडगर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाबाबतची पूर्वसूचना दिली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, अमोल कारंडे, सुनील बंडगर, निमिषा वाघमोडे, देवीदास पाटील, सुभाष म्हस्के, देवेंद्र मदने, सिद्धारूढ बेडगनूर, अतुल गावडे, यशवंत नरुटे, यलगुंड सातपुते, राम वाकसे आदींचा समावेश होता.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News