Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALदक्षिण भाजपामध्ये बंडखोरी , वसंत पाटलांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार; राजकीय क्षेत्रात खळबळ...

दक्षिण भाजपामध्ये बंडखोरी , वसंत पाटलांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार; राजकीय क्षेत्रात खळबळ…

दिंडनेर्ली , (सागर शिंदे ) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे.अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या व काटे की टक्कर समजल्या जाणाऱ्या करवीर दक्षिण मतदार संघात भाजपामध्ये बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपाचे करवीरचे माजी अध्यक्ष वसंत पाटील यांनी आज कंदलगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेउन दक्षिण मतदार संघातुन निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे भाजपच्या महाडिक गटात खळबळ उडाली आहे.

या मतदार संघात जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव माजी आमदार अमल महाडिक यांच्यात चुरशीची लढत झाली होती त्यात ऋतुराज पाटील हे विजयी झाले. आत्ताही तशीच लढत यावेळी होणार आहे. एक-एका मतासाठी दोघांकडून व्यूहरचना सुरू आहेत.असे असतानाच कागलमध्ये समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपला धक्का बसला आहे तर महायुतीत असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही हा मोठा धक्का मानला जात आहे. हि राजकीय गणिते फिरत असताना दक्षिण मतदार संघात मात्र राजकीय बाँब फोडण्याची तयारी सुरू झाली आहे. कंदलगाव येथे भाजप कार्यकर्ते यांची शनिवारी बैठक झाली. बैठकीला 25 गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावले होते. त्या पैकी 23 गावचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी भाजपाचे करवीरचे माजी अध्यक्ष वसंत पाटील यांची उमेदवारी भाजपाकडून मागणी करण्याचे ठरले व दिली नाही तरीही बंडखोरी करुन वसंत पाटील याची उमेदवारी निश्चित करण्याचा निर्णय झाला. लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेउन अंतिम घोषणा करण्यात येणार असल्याचे वसंत पाटील यांनी Ab9 मराठी बरोबर बोलताना सांगितले.
या घटनेने भाजपा दक्षिण मधला वाद चव्हाट्यावर आला आहे. येत्या काळात वसंत पाटील काय भूमिका घेणार इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News