प्रयाग चिखली:
वरणगे पाडळी, तालुका करवीर येथील प्रतिष्ठित नागरिक व करवीर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र पाटील यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 90 वर्षाचे होते
जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे करवीर तालुका पंचायत समितीचे ते माजी सभापती होते त्यांच्या काळात करवीर तालुक्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला त्यांची राजकीय व सर्व क्षेत्रात अफाट लोकप्रियता होती.त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आहे.