Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALकोल्हापुरात वस्तादांचा डाव, तीन नेते पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर...

कोल्हापुरात वस्तादांचा डाव, तीन नेते पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर…

कोल्हापूर: राजकारणातील वस्ताद अर्थात शरद पवार हे कोल्हापूरात तब्बल तीन दिवस तळ ठोकून आहेत.पहिल्याच दिवशी मंगळवारी महायुतीशी संबंधित राधानगरी,भुदरगड मतदार संघातील तीन मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.त्या मधील मंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकारी माजी आमदार के.पी.पाटील यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. तर त्या पाठोपाठ त्यांचे मेव्हणे ए वाय पाटील यांनीही पवारांची भेट घेतली.त्यानंतर भाजपला रामराम ठोकून बाहेर पडलेले भाजपचे जिल्हा अध्यक्ष राहूल देसाई यांनी ही पवारांची भेट घेतली. हे तीन नेते पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाच्या तयारीत असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News