मुंबई : मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी येथील एका २० वर्षीय मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.




