Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialखुपिरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कृष्णात जाधव तर उपाध्यक्ष पदी वैशाली चौगले

खुपिरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कृष्णात जाधव तर उपाध्यक्ष पदी वैशाली चौगले

दोनवडे प्रतिनिधी: खुपीरे ता.करवीर येथील अत्यंत चुरशीच्या झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत   अध्यक्षपदी कृष्णात महादेव जाधव तर उपाध्यक्षपदी वैशाली सागर चौगले यांची निवड झाली.

या शालेय समितीची निवडणूक शाळेच्या इतिहासात प्रथमच झाली. निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची ईर्षा पहावयास मिळाली. ग्रामपंचायत  विरोधी गटास 8 जागा तर सत्ताधारी गटास 2 जागांवर समाधान मानावे लागले.

विजयी सदस्य असे:
संजय राजाराम कांबळे, रेश्मा संदीप पाटील,आप्पासो धुळाप्पा रेवडे, युवराज आनंदा पाटील,कोमल भरत नाईक, उदय शिवाजी पाटील, मनीषा महादेव पाटील, रेश्मा विकास कांबळे

निवडणुक पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख महेंद्र स्वामी, तौंदकर सर यांच्यासह  सचिन पाटील,युवराज पाटील ,डे. सरपंच सागर पाटील,संजय दादू पाटील सर,संजय सखाराम पाटील, डॉ. आर.एच. पाटील , तंटामुक्त अध्यक्ष आबासो पाटील, राम पाटील,पै.युवराज पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी निवड प्रक्रियेसाठी महत्वाची भूमिका पार पाडली.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News