कोथळी करवीर: समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचे जीवन आनंददायी करण्यासाठी तपोवन ज्येष्ठ नागरिक संघ विविधांगी उपक्रम राबवत नेहमीच कटिबध्द राहील असे प्रतिपादन शंकरराव भोला यानी केले. येथील तपोवन ज्येष्ठ नागरिक संघाची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली त्यावेळी संस्था अध्यक्ष म्हणून समारोप प्रसंगी ते बोलत होते.
संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या विरंगुळा केंद्रामध्ये खेळीमेळीत व ज्येष्ठ नागरिक सभासदांच्या मोठ्या संख्येने उत्चाहात शनिवारी संपन्न झाली.प्रारंभी उपाध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी सभासदांचे स्वागत केले.त्यानंतर दीप प्रज्वलन,नोटीस वाचन,प्रास्ताविक झाले.सचिव प्राचार्य शिवाजीराव अक्कोलकर व कोषाध्यक्ष मोहनराव मानकर यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर केला व मागील वर्षाचा वृत्तान्त वाचून दाखवला.मागील वर्षाचा लेखापरीक्षक अहवालास व पुढील वर्षाच्या अंदाज पत्रकास मंजुरी, लेखा परीक्षक व कायदा सल्लागार यांची नियुक्ती व मानधन मंजुरी अशा विविध विषयांना सर्व उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.त्यानंतर नवीन सभासदांच्या ओळखी,चालू महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचे सत्कार,पुढील वर्षातील संभाव्य कार्यक्रमांची रूपरेषा आदी विविध विषयावरील चर्चा असे विविध कार्यक्रम मोठ्या आनंदाने संपन्न झाले.या प्रसंगी सभेला उपस्थित माजी अध्यक्ष विजयराव चव्हाण,माझी उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी, माजी यांनी सभेला बहुमूल्य मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा तुकाराम गुरव,सौ.उर्मिला कुलकर्णी व प्रभाकर जाधव यांनी केले.आभार प्रदर्शन सचिव प्राचार्य शिवाजीराव अक्कोळकर यांनी केले.यावेळी संस्थेचे सर्व विद्यमान संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.