कोथळी करवीर /तानाजी पोवार:महाविद्यालया समोर रस्त्यावर दररोज होणारे वाद… कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर केले जाणारे विनोद… तासन् तास रस्त्याच्या बाजूला गाड्या उभ्या करून गप्पा मारणारी टोळकी… आणि कॉलेज प्रवेशद्वारात अतिक्रमण केलेल्या कॉलेज बाह्य विद्यार्थ्यांचा चालणारा धिंगाणा… असे चित्रच कुरुकली तालुका करवीर येथील भोगावती महाविद्यालय परिसरामध्ये दिसत असल्यामुळे पोलिसांच्या निर्भया पथकाची भीती कमी झाली आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या या वातारवणाचा कॉलेज प्रशासनालादेखील त्रास होत असून त्यांनी हे प्रकार रोखण्यासाठी पोलिस, तसेच कॉलेज प्रशासनाने मदत करावी, अशी पालकातून विचार ना होत आहे
शाळा, कॉलेज, खासगी क्लास परिसरातील मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांचे निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. परंतु, कॉलेजांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू होताच, कॉलेजच्या बाहेर टाइमपास करीत बसणाऱ्या युवकांची संख्या वाढली आले. त्यामुळे छेडछाड रोखण्यासाठी असणारे निर्भया पथक कॉलेज सुरू झाले पासुन फक्त एक वेळ या ठिकाणी फेरी मारून गेली असल्याने अद्याप या कार्यक्षेत्र अंतर्गत असणारे निर्भया पथक सुट्टीवरच असल्याची परिस्थिती आहे.का? विशेष म्हणजे, कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांना सुरक्षा देणे, त्यांची छेडछाड होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे कॉलेज प्रशासन करीत आहे. त्यासाठी कॉलेजच्या आवारात अॅन्टी रॅगिंग कमिटीदेखील कार्यरत करण्यात आली आहे. परंतु, कॉलेजच्या प्रवेशद्वाराबाहेर टाइमपास करणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करण्यात कॉलेज प्रशासनाला मर्यादा येत असल्यामुळे आता विद्यार्थ्यांचा त्रास रोखण्यासाठी थेट पोलिस प्रशासन व महाविद्यालय व्यवस्थापक प्रशासनाची मदत घेण्याची तयारी करण्यात आली आहे.मागील आठवड्यातच या महाविद्यालया बाहेर शेजारीच असणाऱ्या बस स्टॉप वर असणाऱ्या एका झाडावर मधमाशांचे पोळे काही तरुणांनी दगड मारून उठवल्याने पिसळलेल्या मधमाशांनी तेथे असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी वर हल्ला केला होता या हल्यामध्ये सहा विद्यार्थिनी गंभीरित्या जखमी झाल्या होत्या त्यांना महाविद्यालय कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात या झालेल्या घटनेची विद्यार्थिनींच्या पालकांनी कॉलेज प्रशासनाकडे तक्रार दिल्यानंतर कॉलेजचे प्राचार्य डी ए चौगुले यांनी पोलिसांकडे व निर्भया पथकाकडे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी तक्रार दाखल केली असली तरी कॉलेज बाह्य व हुलडबाज तरुणांकडून होणारे प्रकार रोखण्यासाठी महाविद्यालय प्रशासन ,करवीर पोलीस व निर्भया पथकाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
चौकट शिवसेना(उ बा बा) जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडून दाखल
मागील आठवड्यात भोगावती महाविद्यालया बाहेर विद्यार्थ्यांनी बस स्टॉप वर उभ्या असताना मधमाशीचे हल्ल्यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थिनी जखमी झाल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना समजताच त्यांनी तात्काळ विद्यार्थिनी व विद्यार्थिनींच्या पालकांशी विचारपूस केली कॉलेजचे प्राचार्य डी ए चौगुले व प्रशासनाशी संपर्क साधून कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षितेची लक्ष देऊन काळजी घ्यावी पोलीस प्रशासन व निर्भया पथकाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केल्यानंतर निर्भया पथकाने व कॉलेज प्रशासनाने दखल घेतली आहे